सी डब्ल्यू किंग :- “सामाजिक चळवळ ही एक अशी प्रक्रिया होय की जिचा उद्देश हा विचार, व्यवहार आणि सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन आणणे हा असतो”
लँग आणि लँग :- “सामाजिक चळवळ अशा एका व्यापक आधारावर उभी असते की ज्याचा उद्देश सामाजिक व्यवस्थेतील मूलभूत स्वरूपावर प्रभाव टाकणे आणि त्यास नवे स्वरूप प्रदान करणे हा असतो”
हँन्स टॉच :- “समाजात सामूहिक स्तरावर अनुभवल्या जाणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी फार मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या लोकप्रयत्नाला सामाजिक चळवळ असे म्हणतात.”
जॉन विल्सन :- “सामाजिक व्यवस्थेत व्यापक प्रमाणावरील परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडून येणार्या बदलांना प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक, संघटितरीत्या, असंस्थीकृत साधनांचा वा मार्गांचा अवलंब करून करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय.”
एम एस ए राव यांच्या मते, “समाजातील एखाद्या घटकांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली विचारप्रणाली वरील आधारित सामूहिक कृती म्हणजे सामाजिक चळवळ होय.”