शासनसंस्था :- (Government)

भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांएवढाच राज्याचा तिसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे शासनसंस्था होय. लोकांनी विशिष्ट भूप्रदेशावर कायमचे वास्तव्य केल्यामुळे राज्य निर्माण

होत नाही, तर त्यासाठी लोकांमध्ये राजकीय संघटन होणे गरजेचे असते. शासनसंस्था

समाजाला संघटित ठेवण्याचे कार्य करते. शासनसंस्था हे राज्याचे ‘मूर्त स्वरूप होय. राज्यसंस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करणारे साधन म्हणून शासनसंस्थेकडे पाहिले जाते. शासनसंस्थेचे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ हे तीन प्रमुख घटक असतात. शासनसंस्थेच्या घटकांतील परस्परसंबंध व स्वरूपाच्या आधारावर लोकशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही, राजेशाही, हुकूमशाही, लष्करशाही, सामावादी व्यवस्था असे विविध शासनप्रकार दिसून येतात. वरील शासनप्रकारापैकी कोणता शासनप्रकार असावा हे नेमके सांगता येत नाही. देशातील लोकांची मानसिकता, संस्कृती, पूर्वपरपरा, देशाची परिस्थिती, आर्थिक व शैक्षणिक प्रगती देशाची राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा बाबींवर त्या देशातील शासनाचा प्रकार अवलंबून असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *